Photo : X
महाराष्ट्र

बीडमध्ये सहा भाविकांना कंटेनरने चिरडले; चौघांचा मृत्यू; दोनजण गंभीर

नामलगाव फाट्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले असून यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व लोक देवदर्शनासाठी पायी निघाले होते. बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

Swapnil S

बीड : नामलगाव फाट्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले असून यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व लोक देवदर्शनासाठी पायी निघाले होते. बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. हे सर्व लोक बीड जिल्ह्यातील पेंडगाव येथे दर्शनासाठी पायी जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

विशाल श्रीकिसन काकडे (रा. शेकटे, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), अमोल नामदेव गरजे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव), आकाश कोळसे, पवन जगताप, किशोर तोर (रा. बाबुलतरा, ता. गेवराई) ही मृतांची नावे आहेत. आणखी दोन जणांचा मृतांमध्ये समावेश झाला असून त्यांची ओळख नावे अद्याप पटलेली नाही.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता