महाराष्ट्र

Satara News : बिअरच्या ट्रकला कंटेनरची धडक; नागरिकांनी केली बाटल्यांची यथेच्छ लूट, चालक जखमी

कराड येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या मालट्रकला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला तर मालासह वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर नांदलापूर, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Swapnil S

कराड : येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या मालट्रकला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला तर मालासह वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर नांदलापूर, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान, अपघातग्रस्त मालट्रकमध्ये बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स होते. अपघातानंतर बिअरच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या. या बाटल्या नेण्यासाठी अनेकांनी त्याठिकाणी धाव घेत शेकडो बाटल्या यावेळी पळविण्यात आल्या. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

भिवंडीहून बिअरचे बॉक्स घेऊन मालट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. पुणे-बंगळुरू महामार्गावर नांदलापूर गावच्या हद्दीत ट्रक आला असता, चालकाने ट्रक महामार्गाकडेला थांबवला. त्याचवेळी पाठीमागून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक झाली.

या धडकेत ट्रक महामार्गावरच आडवा झाला. ट्रकमधील बिअरच्या बाटल्या भरलेले बॉक्स महामार्गावर पडल्याने फुटून काचांचा खच पसरला होता. या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला आहे. मात्र अपघातानंतर नागरिकांनी बिअरच्या बाटल्या पळवल्या.

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

CBSE चा मोठा निर्णय! २०२७ पासून DigiLocker वर मिळणार तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती, वाचा सविस्तर

भरधाव ट्रकने कारला फरफटत नेले; थोडक्यात वाचला बाप-लेकीचा जीव, अंगावर शहारे आणणारा VIDEO व्हायरल

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी