महाराष्ट्र

भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात, 'या' जिल्ह्यांतून जाणार राहुल गांधी; मुंबईत जाहीर सभेने सांगता

यात्रेची सांगता मुंबईत जाहीर सभेने होणार आहे. मुंबईतील सभा १३ अथवा १४ मार्च रोजी होणार आहे.

Swapnil S

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १० मार्च रोजी गुजरातमधून नंदूरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे, असे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ही यात्रा नंदूरबार येथून धुळे, मालेगाव आणि नाशिकमध्ये जाणार आहे. नाशिकमध्ये राहुल गांधी हे प्रसिद्ध काळाराम मंदिरात आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांची भिवंडी येथे जाहीर सभा होणार आहे.

यात्रेची सांगता मुंबईत जाहीर सभेने होणार आहे. मुंबईतील सभा १३ अथवा १४ मार्च रोजी होणार आहे. पूर्व ते पश्चिम म्हणजे मणिपूर ते मुंबई असा १५ राज्यांमधून जवळपास ६७०० कि.मी.चा प्रवास असून वाटेत ते सर्वसामान्य जनतेला भेटणार आहेत. न्याय हा मुख्य संदेश अधोरेखित करण्याचा गांधी यांचा प्रयत्न असेल, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

विकासाला देणार गती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नीती आयोगाच्या बैठकीत निर्धार

१२ वर्षांच्या प्रचारकाळात हरवलेला भारत

आजचे राशिभविष्य, १२ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

संध्याकाळी जंकफूड खाण्याची सवय सोडा, ५ मिनिटांत तयार होणारे 'हे' ६ हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा

सतत गोड खायची इच्छा होते? शरीरातील 'या' बदलांकडे लक्ष द्या