महाराष्ट्र

Pune : अपहरण झाले नसून तरुणासोबत मर्जीनेच आलेय; भिगवणमधील संबंधित मुलीने पोलिसांना, घरच्यांना पाठवला व्हिडिओ

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती.

Swapnil S

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घडामोडींनतर भिगवणमध्ये हिंदू संघटनांच्यावतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते. या मोर्चापूर्वीच संबंधित तरुणीने एक व्हिडिओ शेअर केला. त्यात संबंधित मुलीने आपले अपहरण झाले नसून आपण मर्जीनेच तरुणासोबत आल्याचे म्हटले आहे.

जबरदस्तीने व्हिडिओ केला तयार - पडळकर

दरम्यान, या मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करुन तो पोलीस अधिकारी, त्यांच्या नातेवाईकांना पाठवला असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी पडळकर यांनी चर्चा केली. मुलीला वडील नाहीत. मुलीचे लग्न ठरलेले होते, दोन - चार दिवसांत लग्न होणार होते, अशा परिस्थितीत जबरदस्तीने मुलीचे अपहरण केले गेले आहे, असा आरोप पडळकर यांनी केला. मुलीचे अपहरण झाल्याने आपण भिगवणला आलो असून भिगवण पोलीस ठाण्याला भेट देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

मुलाच्या चुलत्याविरोधात कारवाई का नाही?

पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवणे म्हणजे त्यांचे धाडस वाढले आहे. या मुलाला वाचवण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे, असा त्याचा अर्थ आहे. मुलाचा चुलता इथला गुंड आहे. हिंदू मुलींच्या अपहरणात तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. मंदिरांचा ते कब्जा घेत आहेत, मंदिरातील मूर्तींची मोडतोड केलेली आहे. असे का घडतेय? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पोलीस प्रशासन इतके दिवस का गप्प आहे, असा सवाल देखील गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात तो आरोपी आहे, माझ्याकडे यादी आहे. इतक्या गुन्ह्यात तो आरोपी असेल तर त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई का झाली नाही? असा सवाल पडळकर यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांसोबत सविस्तर चर्चा करुन सत्य मांडणार असल्याचे ते म्हणाले.

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण