संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

भीमा-कोरेगावप्रकरण : ॲड. सुरेंद्र गडलिंग यांना जामीन मंजूर

भीमा-कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आणि वकील-कार्यकर्ते सुरेंद्र गॅडलिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने सोमवारी कोठडीच्या आधारावर जामीन मंजूर केला.

Swapnil S

उर्वी महाजनी/मुंबई

भीमा-कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आणि वकील-कार्यकर्ते सुरेंद्र गॅडलिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने सोमवारी कोठडीच्या आधारावर जामीन मंजूर केला.

न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केले की, या खटल्यातील इतर सर्व आरोपी आधीच जामिनावर सुटले असून समानतेच्या तत्त्वावर गडलिंग यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. गडलिंग यांना इतर सहआरोपींसाठी विशेष न्यायालयाने घातलेल्या अटी व शर्तींच्या आधारेच जामीन मिळाला असून सविस्तर आदेश नंतर उपलब्ध करून दिला जाईल.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने गडलिंग यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. यंत्रणेने त्यांच्यावर सुरजगड जाळपोळ प्रकरणात सहभागाचा आरोप केला असून यात ८० हून अधिक वाहने पेटवून देण्यात आली होती. या प्रकरणातही त्यांना आधीच कोठडीत असताना अटक करण्यात आली होती.

तरीही तुरुंगातच राहावे लागणार

भीमा-कोरेगाव प्रकरणात जामीन मंजूर झाला असला तरी गडलिंग यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे, कारण सुरजगड (गडचिरोली) जाळपोळ प्रकरणातील त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या आदेशामुळे आठ वर्षांहून अधिक जुन्या या प्रकरणातील सर्व आरोपी आता जामिनावर बाहेर आले आहेत.

मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकांना ४२१ कोटींचे अनुदान; पुणे महापालिकेला सर्वाधिक १०९ कोटी, नाशिकला २१ कोटी २५ लाख रुपये

कपडे धुणे झाले आता महाग; 'सर्फ एक्सेल', 'रिन', 'व्हील'च्या किमतीत ११ टक्क्यांपर्यंत वाढ

फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईचा श्वास कोंडला; लक्ष्मीपूजनानंतर प्रदूषणात मोठी वाढ; सरासरी AQI १७१, आठ ठिकाणी हवा 'खराब' श्रेणीत

विद्याविहारमध्ये आग विझवण्यासाठी स्विमिंग पूलमधील पाण्याचा आधार; अग्निशमन दलाकडे अवघे २२ वॉटर टँकर, ४२ फायर इंजिन

Nashik : सोनं खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले अन् अडीच तोळ्यांच्या अंगठ्या घेऊन पळाले! दोघांची हातचलाखी CCTV मध्ये कैद