महाराष्ट्र

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने ऍड.अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला आहे

नवशक्ती Web Desk

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्ररणी अटकेत अटकेत असलेल्या आरोपी ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांनी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या दोघांवर माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप आहेत. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने ३ मार्च रोजी निकाल राखून ठेवल्यानंतर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेल्या ऍड.अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला आहे.

ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस हे भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी २०१८ पासून तुरुंगात आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावेळी अशाचं प्रकरणात सहआरोपी असलेल्या सुधा भारद्धाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा युक्तीवाद या दोघांनी कोर्टात केला.

भीमा कोरेगाव दंगलीच्या सहा महिन्यानंतर २०१८ च्या ऑक्टोबर महिन्यात ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना बेकादेशीर कृती कायदा (UAPA)अंतर्गत अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यावर मोओवाद्याशी संबंध असल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. यावेळी यांच्यासह सुधा भारद्वाज, पी वारा राव आणि गौतम नवलखा या इतर कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली होती. सुरुवातीला या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नजरकैदैत ठेवण्यात आलं होतं.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे