महाराष्ट्र

SSC, HSC Board Exam : दहावी, बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात मोठी बातमी ... तर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे निर्देश

10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहेत

प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. उशिरा येण्याच्या सवलतीचा फायदा विद्यार्थी घेत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहेत. पेपरची वेळ सकाळच्या सत्रात 11 आणि दुपारी 3 वाजता आहे. अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी आतापर्यंत, विद्यार्थ्यांना पेपरची परवानगी दिली जात होती. परंतु राज्य मंडळाने केंद्रांना उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे निर्देश दिले आहेत. आता विद्यार्थ्यांना सकाळी 10:30 आणि दुपारी 2:30 वाजता परीक्षेला बसणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील पत्रही मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.

उशिरा येण्याच्या सवलतीचा फायदा घेऊन लेखी परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील मजकूर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मंडळाने याची दखल घेत कारवाई केली. मात्र या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षेला हजर राहावे. गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने परिपत्रक काढले आहे. यापुढे परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत