संग्रहित छायाचित्र एक्स @SVW790
महाराष्ट्र

आशा सेविका आणि गट प्रवर्तकांना मोठा दिलासा! अपघाती मृत्यूनंतर १० लाख तर अपंगत्व आल्यास ५ लाखाची मदत

आरोग्य विषयी जनजागृती, प्रोत्साहन देणे, माता व बाल आरोग्य या विविध कामाच्या जबाबदाऱ्या यशस्वी रित्या पार पडणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकाना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

Swapnil S

मुंबई : आरोग्य विषयी जनजागृती, प्रोत्साहन देणे, माता व बाल आरोग्य या विविध कामाच्या जबाबदाऱ्या यशस्वी रित्या पार पडणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकाना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सेवा बजावताना अपघाती मृत्यू आला तर १० लाखांची, तसेच कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित १.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास १० लाख  व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास ५ लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

आपटा रेल्वे स्थानक बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन; सीएसएमटीनंतर सर्वाधिक पसंती; मध्य रेल्वेला ८५ लाखांचा महसूल

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर होणार कारवाई; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना

पास विद्यार्थांपेक्षा जागा अधिक; अकरावीसाठी मुंबईत ४ लाख ७६ हजार जागा, ठाण्यात १ लाख ६० हजार जागा उपलब्ध

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका

मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका