महाराष्ट्र

भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी सर्वंच पक्षांनी कंबर कसली आहे. याआधी ५८ जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपने आणखी २२ जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी सर्वंच पक्षांनी कंबर कसली आहे. याआधी ५८ जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपने आणखी २२ जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच राज्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षांची संख्या ८० वर पोहोचली आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबई आणि नाशिकमधील जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. भाजपने उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षपदी ज्ञान मूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी नीरज उभारे तर दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदावर शलाका साळवी यांची नेमणूक केली आहे. नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ सुनील केदार यांच्या गळ्यात पडली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष

  • पालघर - भरत राजपूत

  • वसई - विरार - प्रज्ञा पाटील

  • अहिल्या नगर - अनिल मोहिते

  • पुणे दक्षिण (बारामती) - शेखर वढणे

  • कोल्हापूर शहर - विजय जाधव

  • गडचिरोली - रमेश बारसागडे

  • चंद्रपूर शहर - सुभाष कासमगुट्टवार

  • चंद्रपूर ग्रामीण - हरीष शर्मा

  • वर्धा - संजय गाते

  • परभणी - सुरेश भुंबरे

  • छ. संभाजीनगर शहर - किशोर शितोळे

  • लातूर शहर - अजित पाटील - कव्हेकर

  • लातूर ग्रामीण - बससवराज पाटील

  • नांदेड उत्तर - किशोर देशमुख

  • नांदेड दक्षिण - संतुकराव हंबर्डे

  • बीड - शंकर देशमुख

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video