@AmitShah/X
महाराष्ट्र

भाजप १६० जागांसाठी आग्रही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असतानाच ‘महायुती’तील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आदी पक्षांमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू आहे.

Swapnil S

प्राजक्ता पोळ/मुंबई :

राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असतानाच ‘महायुती’तील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आदी पक्षांमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू आहे. भाजपने २८८ पैकी १६० जागांवर दावा केला आहे. त्यामुळे केवळ १२८ जागा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत भाजपला किती जागा लढवायच्या आहेत आणि महायुतीच्या आघाडीच्या साथीदारांना किती जागा सोडायच्या, हा चर्चेचा विषय होता.

विधानसभा निवडणूक लढवताना ती एकसंघपणे लढवायची आहे. त्यामुळे ‘महायुती’च्या जागावाटप आणि कार्यप्रणालीवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची सोमवारी विमानतळावर भेट घेतली. यावेळी पवार यांच्यासोबत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. त्यानंतर अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला मात्र अजित पवार उपस्थित नव्हते.

महायुतीची पुढील बैठक दिल्लीत

विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी पुढील बैठक दिल्लीत होणार असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी सांगितले.

त्या जागांचा निर्णय लवकरच!

विद्यमान आमदारांनी काय काम केले, त्यांच्या मतदार संघात मतदारांचा कौल याचा अभ्यास करुन ज्या मतदारसंघात उमेदवार निवडून येईल याची खात्री असेल त्या जागांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही अमित शहा यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा जागांबाबत योग्य निर्णय घ्या, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्याचे समजते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी