महाराष्ट्र

भाजपचा दंगल उसळवण्याचा कट; हायकोर्टात याचिका, २७ मार्चला सुनावणी

Swapnil S

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगल उसळवण्याचे भाजपचे षड‌्यंत्र असून धार्मिक तेढ निर्माण करणारी भडकावू विधाने करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन, तेलंगणातील टी. राजा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्या, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

शिक्षिका अफताब सिद्दीकी यांच्यासह मीरा रोड, भाईंदर, अंधेरी येथील नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेची न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकेची सुनावणी २७ मार्चला निश्‍चित केली.

भाजप आमदारांनी मीरा रोड, मालवणी, गोवंडी आदी ठिकाणी भडकाऊ विधाने करत धार्मिक वातावरण कलूषित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. याचा निवडणूक काळात परिणाम होऊ शकतो, धार्मिक दंगल भडकली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिसांना संबंधित आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या,अशी विनंती केली आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणारी भडकाऊ विधाने केली जात असल्यास पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र मीरा-भाईंदर व मुंबई पोलिसांनी भाजप आमदारांवर गुन्हे न नोंदवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे नितेश राणे, गीता जैन आणि टी. राजा यांच्या भडकाऊ विधानांनी उल्लंघन केले आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस