पासपोर्ट, टपाल कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी; राज्यातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर 
महाराष्ट्र

पासपोर्ट, टपाल कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी; राज्यातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर

राज्यातील सर्व पासपोर्ट कार्यालये आणि टपाल कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा एक निनावी संदेश बीड टपाल कार्यालयात धडकल्याने एकच खळबळजनक उडाली.

Swapnil S

बीड : राज्यातील सर्व पासपोर्ट कार्यालये आणि टपाल कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा एक निनावी संदेश बीड टपाल कार्यालयात धडकल्याने एकच खळबळजनक उडाली. कार्यालयात दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी आलेल्या ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. सायनॉइड विषारी वायू मिश्रित १६ आरडीएक्स बॉम्बचे स्फोट करण्यात येतील, असा इशारा या संदेशात देण्यात आला आहे. या धमकीवजा संदेशामुळे बीडसह राज्यातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला 'कोयंबटूरचे मुसलमान' म्हणवून घेणाऱ्या एका अज्ञात गटाने हा ई-मेल पाठवला आहे. या संदेशात अत्यंत प्रक्षोभक भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत. तामिळनाडूतील काही राजकीय घडामोडी, केंद्र सरकारची ‘यूएपीए’ अंतर्गत झालेली कारवाई आणि या प्रकरणांमध्ये माध्यमांनी अपेक्षित साथ न दिल्याने निर्माण झालेल्या रागातून हे पाऊल उचलल्याचा दावा या गटाने केला आहे. विशेष म्हणजे, हे स्फोट घडविण्यासाठी नक्षलवादी आणि ‘आयएसआय’ सेलची मदत घेतल्याचेही या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड