महाराष्ट्र

नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

भारतीय जनता पक्ष सर्व कायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे.

Swapnil S

मुंबई : भारतीय जनता पक्ष सर्व कायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

राज्य निवडणूक अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, नितीन गडकरी यांनी प्रचारात धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपचा हा प्रकार अनैतिक असून या पोस्टर्सचा वापर काँग्रेसविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला आहे. निवडणूक आयोगाने तत्काळ त्यांची उमेदवारी रद्द करून भाजपवर योग्य दंड ठोठावावा, अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्ष सर्व नियम धुडकावत असताना निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपवर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपच्या कठपुतळ्या झाल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, पण भाजप नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणूक आयोग दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा सवालही लोंढे यांनी केला आहे.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Iran Israel War : जहाजांचा युद्ध विमा महाग; संघर्षामुळे अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार; विमा कंपन्यांचा निर्णय