महाराष्ट्र

जागावाटपासाठी उमेदवाराची विजयी क्षमता हाच निकष - रावसाहेब दानवे

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवाराची विजयी क्षमता हाच जागावाटपाचा निकष असेल, असा विश्वास भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवाराची विजयी क्षमता हाच जागावाटपाचा निकष असेल, असा विश्वास भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच यंदाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कोणतीही मैत्रीपूर्ण लढती होणार नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. जागावाटपावर आम्ही सौहार्दपूर्ण तोडगा काढू आणि त्यानुसार लढू, असेही ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजेल. राज्यात एनडीएचे सरकार सत्तेत आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. जिल्हा पातळीवर भाजपने स्थापन केलेल्या समित्या केल्या आहेत. भाजपने स्थापन केलेल्या समित्यापैकी एका समितीचा मी स्वतः अध्यक्ष आहे, तर दिलीप कांबळे सह-संयोजक आहेत. जाहीरनामा समितीचे सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष आहेत. सामाजिक समितीत पंकजा मुंडे आहेत. तर प्रचार यंत्रणा समितीत रवींद्र चव्हाण आहेत. सहकार समितीत प्रवीण दरेकर आहेत. सोशल मीडिया समितीमध्ये निरंजन डावखरे प्रमुख आहेत. राज्यपातळीपासून बूथ स्तरापर्यंत या समित्या बनवल्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

मराठा आंदोलनामुळे जालन्याची जागा गेली - दानवे

मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे जालन्यातील जागा हातची निसटली. याचा धसका घेत आम्ही कोणालाही कमी समजत घेत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी १६ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी भाजपने रणनीती आखली असून निवडणुकीत दगाफटका होणार नाही, याची विशेष काळजी घेतल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे