महाराष्ट्र

विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल; छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकूर प्रकरण

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर हटवला नाही, या कारणावरून महाराष्ट्र सायबरने विकिपीडियाच्या किमान चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केरण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

Swapnil S

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर हटवला नाही, या कारणावरून महाराष्ट्र सायबरने विकिपीडियाच्या किमान चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केरण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

या संदर्भात नोडल एजन्सीने कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाऊंडेशनला नोटीस पाठवली होती आणि संबंधित मजकूर हटवण्याची विनंती केली होती. विकिमीडिया फाऊंडेशन ही विकिपीडिया होस्ट करणारी ना-नफा संस्था आहे.

महाराष्ट्र सायबर एजन्सीने या नोटीसमध्ये नमूद केले होते की विकिपीडियावरील मजकूर चुकीचा आहे आणि तो राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने समस्या निर्माण करू शकतो. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्याकडे संपूर्ण भारतात अत्यंत आदराने पाहिले जाते. विकिपीडियावर प्रसिद्ध झालेल्या या माहितीमुळे त्यांच्या अनुयायांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते.

विकिपीडियाकडून या मजकूर हटवण्याबाबत कोणताही प्रतिसाद न आल्याने, महाराष्ट्र सायबरने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत विकिपीडियाच्या किमान चार संपादकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणावर आक्षेप नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपट ‘छावा’च्या पार्श्वभूमीवर आले आहेत. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे.

"हॉटेलमध्ये बोलवत होता..."; अभिनेत्रीचे नेत्यावर गंभीर आरोप, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-"मला...

राज ठाकरे अचानक 'वर्षा'वर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट; म्हणाले, ''आपण कबुतर, हत्ती यात अडकलो, पण...''

'लाडकी बहीण' योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट ; महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत होणार कारवाई

MMRDA ला अखेर जाग; मोनोरेलची प्रवासीक्षमता निश्चित; गाड्यांची तपासणी होणार