२४६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा; १८४ मिश्र विशेष गाड्या, ६२ अनारक्षित विशेष गाड्या 
महाराष्ट्र

२४६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा; १८४ मिश्र विशेष गाड्या, ६२ अनारक्षित विशेष गाड्या

गणपती उत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २४६ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या ९८ गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या ७६ गाड्या, पुण्यावरून सुटणाऱ्या १० गाड्या आणि अनारक्षित विशेष ६२ गाड्यांचा समावेश आहे.

Swapnil S

मुंबई : गणपती उत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २४६ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या ९८ गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या ७६ गाड्या, पुण्यावरून सुटणाऱ्या १० गाड्या आणि अनारक्षित विशेष ६२ गाड्यांचा समावेश आहे.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसएमटी ही दररोज धावणाऱ्या विशेष गाडीच्या ३२ फेऱ्या चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०११०३ ही ११ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी ३.३० वाजता सुटेल. या गाडीच्या १६ फेऱ्या चालविण्यात येतील, तर गाडी क्रमांक ०११०४ ही विशेष गाडी १२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सावंतवाडी रोडवरून पहाटे ४.३५ वाजता सुटेल. या गाडीच्या १६ फेऱ्या असतील.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसएमटी दैनिक विशेष गाडीच्या ३४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०११५१ क्रमांकाची ही विशेष गाडी ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल. या गाडीच्या १७ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत, तर गाडी क्रमांक ०११५२ ही विशेष गाडी ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून दुपारी ३.३५ वाजता सुटेल.

सीएसएमटी - रत्नागिरी - सीएसएमटी दैनिक विशेष गाडीच्या ३२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०११५३ क्रमांकाची विशेष गाडी ११ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल. या गाडीच्या १६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत, तर गाडी क्रमांक ०११५४ ही विशेष गाडी १२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज रत्नागिरी येथून पहाटे ४ वाजता सुटेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली