महाराष्ट्र

मध्य रेल्वे चालवणार ४२ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत २८४ अनारक्षित गाड्यांसह ११९८ उन्हाळी विशेष गाड्यांच्या सेवांची घोषणा केली आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत २८४ अनारक्षित गाड्यांसह ११९८ उन्हाळी विशेष गाड्यांच्या सेवांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ११५६ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या फायद्यासाठी ४२ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-करमळी-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (१४ सेवा) चालवणार आहे. ०१०५१ विशेष गाड्या दि. ११ एप्रिल ते २३ मे दरम्यान दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता करमळी येथे पोहोचेल. (७ सेवा)

०१०५२ ही विशेष गाडी १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान शनिवारी करमळी येथून दुपारी २.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल. (७ सेवा)

पुणे - नागपूर - पुणे वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (१४ सेवा) ०१४३९ ही विशेष गाही १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान दर शनिवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता नागपूर येथे पोहोचतील. (७ सेवा) ०१४४० ही विशेष गाडी दि. १३ एप्रिल ते २५ मे रोजी रविवारी नागपूर येथून १६.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.२० वाजता पुणे येथे पोहोचेल. या सर्व गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

पुणे-दिल्ली दरम्यान १४ फेऱ्या

पुणे - हजरत हज़रत निजामुद्दीन - पुणे वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्यांच्या १४ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. ०१४४१ ही विशेष गाडी १५ एप्रिल ते २७ मे दरम्यान दर मंगळवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १८.१० वाजता हज़रत निजामुद्दीनला पोहोचेल. ०१४४२ विशेष गाडी १६ एप्रिल ते २८ मे दरम्यान बुधवारी ह निजामुद्दीन येथून २२.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन