महाराष्ट्र

भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, दोन महिन्यांत ४५ कोटींचा महसूल

झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत वर्षांला ३०० कोटींचे उद्दीष्ट ठेवल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नवशक्ती Web Desk

मुंबई : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून दोन महिन्यांत तब्बल ४५.२९ कोटींचा महसूल मिळाला आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा व शेड हे भंगार साहित्य मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने 'झिरो स्क्रॅप मिशन' साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, एप्रिल व मे महिन्यात भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल झाली असून, झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत वर्षांला ३०० कोटींचे उद्दीष्ट ठेवल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भंगाराची विक्री मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभागांवर उदा. मुंबई (माटुंगा कार्यशाळा), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर येथे विविध ठिकाणी करण्यात आली आहे.विकल्या जाणाऱ्या भंगाराच्या प्रमुख वस्तूंमध्ये ईमयू कोच, आयसीएफ कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर भंगाराचा समावेश होतो. 'झिरो स्क्रॅप मिशन' चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता