CET सेलचे प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र; उच्च-तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा (Photo-X/@ChDadaPatil)
महाराष्ट्र

CET सेलचे प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र; उच्च-तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Swapnil S

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या केंद्राच्या सेवा बुधवारपासून सुरू होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात सीईटी संदर्भात बैठक झाली. बैठकीत पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील टप्प्यावर विश्वासार्ह माहिती, अचूक मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कामांसाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता भासू नये या हेतूने त्यांच्या जिल्ह्यात केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

बैठकीला उच्च-तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. मोहितकर, उच्च शिक्षण संचालक देवळाणकर, जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते.

३६ जिल्ह्यांमध्ये ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येत असून मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

विद्यार्थी सहाय्यता केंद्राचा उद्देश

  • जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, कक्षाच्या अधिनस्त कार्यरत असलेलेल परीक्षा केंद्र आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा यांच्यात समन्वय तसेच संवाद साधणे

  • विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील विषय आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया संबंधित आवश्यक ती सर्व तांत्रिक आणि इतर माहिती देणे

  • विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, तक्रारीचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचा निपटारा करणे

  • विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, पात्रता, क्षमतेनुसार योग्य अभ्यासक्रम, पदवी आणि शैक्षणिक संस्थांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करणे

  • सीईटी परीक्षा आणि कॅप फेऱ्यांशी संबंधित अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा पद्धत, वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.

Thane : ना आरोपपत्र, ना पीडितांना भरपाई; मुंब्रा रेल्वे अपघाताचे एक वर्ष, जखमी प्रवाशांनी गमावली नोकरी, झाले कर्जबाजारी

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य

मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video

यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्ला; नरसंहाराला लष्करी कारवाईचे नाव देऊन गुन्हेगारांचे पाप धुतले जात नाही