महाराष्ट्र

छ. शिवाजी कॉलेज मराठी विभाग व मराठी शिक्षक संघ सामंजस्य करार

संघटनेचे आजवर अनेक महाविद्यालये व विद्यापीठाचे विभाग यांचेशी सामंजस्य करार झालेले आहेत.

Swapnil S

कराड : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांचा सामंजस्य करार नववर्षाचे औचित्य साधून सोमवारी १जानेवारी रोजी करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ ही शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील मराठी शिक्षक यांची महाराष्ट्रातील साहित्य आणि भाषाप्रेमी यांचे संघटन आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन आणि विकसन करण्याचे ध्येय घेऊन या संघटनेने आजवर मराठी प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यासाठी अनेक कार्यक्रम केले.या संघटनेचे आजवर अनेक महाविद्यालये व विद्यापीठाचे विभाग यांचेशी सामंजस्य करार झालेले आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत