संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव हे कायम राहणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नामांतराच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास ‘एमआयएम’ पक्षाने विरोध केला होता. तसेच या विरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका ‘पोस्ट’द्वारे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ९ मे १९८८ रोजी या दोन्ही शहरांचे नामांतर केले होते. त्यावर न्यायदेवतेनेही आज एक प्रकारे मोहोर उठवली आहे.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार; येत्या बुधवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल