महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरण : जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा ठेकेदार मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले

Swapnil S

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा ठेकेदार मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेला बांधकाम रचना सल्लागार चेतन पाटील याने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आता १९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याचाही न्यायालयीन कोठडीचा कालावधी वाढला आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट,२०२४ रोजी घडली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती