महाराष्ट्र

पंतप्रधानांना भेटल्याचा आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर - एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कुटुंबीयासमवेत भेट घेतली

नवशक्ती Web Desk

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कुटुंबीयासमवेत भेट घेतली. या भेटीबद्दल सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत होते. पंतप्रधानांना भेटल्याचा आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर होते. पंतप्रधानांनी माझ्या नातवासोबतही खूप गप्पा मारल्या

मुख्यमंत्र्यांनी आज राजधानी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

या दौऱ्यात पंतप्रधानांना इर्शाळवाडी फुटीची आपत्ती, राज्यातील पावसाची स्थिती आणि रखडलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोदींनी पंत प्रधान यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत मुंबईतील धारावी प्रकल्पावरही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. सुमारे दोन ते अडीच तासांची ही बैठक होती.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक; सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार