मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १७ ऑगस्ट रोजी शुभारंभ  
महाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १७ ऑगस्ट रोजी शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दि. १७ ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दि. १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची आखणी व नियोजन करण्यासाठी शनिवारी बालेवाडी क्रीडा संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रसाद लाड या सर्व मान्यवरांनी बैठकीत नियोजनाचा आढावा घेतला.

सदर कार्यक्रम सुरू होताच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांना हा कार्यक्रम स्क्रीनवर बघता येणार असल्याचे यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत सांगितले. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना असून १७ तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.

याप्रसंगी बैठकीत बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांसाठी हे महत्वाचे पाऊल असून, या योजनेमुळे महिलांच्या समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे, यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत सांगितले.

पुणे जिल्ह्यात यावेळी सर्वात जास्त नोंदणी झाली असल्याची माहिती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली. त्यामुळे पुण्यातून जास्तीत जास्त संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे, आवाहन यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. १७ तारखेचा हा कार्यक्रम महायुती म्हणून आपण यशस्वी करून दाखवू, तसेच या कार्यक्रमासाठी एकत्र येऊन काम करू, तसेच काही अडचण आल्यास हेल्पलाईनवर संपर्क करण्याची सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत दिली. याप्रसंगी बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली