महाराष्ट्र

वाळू डम्परच्या धडकेत बालक ठार; दोन जखमी, संतप्त जमावाने डम्पर पेटवले

जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाळू माफियांच्या दबावापुढे जिल्हा प्रशासन हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

Swapnil S

जळगाव : जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाळू माफियांच्या दबावापुढे जिल्हा प्रशासन हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. बुधवारी सायंकाळी कालिकामाता चौकात अत्यंत वेगाने जाणाऱ्या एका वाळूच्या डम्परने एका दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील बालक हा डम्परच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला तर दुचाकीवरील बालिका व व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ उपस्थित जमावाने डम्पर पेटवून दिला. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

अयोध्या नगरात पाहुणे म्हणून आलेले चेतन बऱ्हाटे हे आपल्या ५ वर्षाचा भाचा योजस आणि ९ वर्षाची भाची भक्ती यांना घेऊन चायनीज आणण्यासाठी दुचाकीवर निघाले होते. त्याचदरम्यान कालिकामाता चौकात भुसावळकडून भरधाव येणाऱ्या वाळूच्या डम्परने त्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस डम्परच्या पुढील चाकाखाली आला तर भक्ती व चेतन बऱ्हाटे हे जबर जखमी झाले. जखमींना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी योजसला मृत घोषित केले.

हा अपघात होताच संतप्त झालेल्या जमावाने तो डम्पर पेटवून दिला. जमावाचा आक्रोश पाहता आमदार सुरेश भोळे घटनास्थळी आले त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्रअखेर पोलिसांना लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत वाळूचे ट्रॅक्टर, डम्पर अथवा ट्रॉलीवर कारवाई करण्याचे आदेश आरटीओला दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आरटीओकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले. शहरातील रस्ते आता सुस्थितीत असल्याने वाहने भरधाव वेगात चालवले जात असल्याचा त्यांनी दावा केला. प्रशासन कारवाई करत असल्याच्या समर्थनार्थ वर्षभरात पकडलेल्या गाड्यांची संख्या देत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्याने भरीव कामगिरी केल्याचा दावा केला जात असला तरी कारवाईबाबत प्रशासन एकमेकांकडे बोट करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती