महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी रविवारी पहाटे निधन झाले.

Swapnil S

कराड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी रविवारी पहाटे निधन झाले. भुईंज, ता. वाई गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा संसदेत खासदार म्हणून निवडून आले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणली व महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले.

या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले. अत्यंत सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.

प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन पुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी दुपारी चार वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येऊन सायंकाळी ५ च्या सुमारास भुईंज येथे देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आता जनगणना 'तुमच्या' हातात! देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना; मोबाईलवरच माहिती भरण्याची नवी सुविधा

वसई-विरारमध्ये पाणीटंचाईचा इशारा! ४ एप्रिलपासून आठवडाभर पाणीपुरवठा विस्कळीत; कोणत्या भागात कधी पाणी बंद? जाणून घ्या

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहनं अडकली; Video व्हायरल

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?