महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरुन काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना घेरलं ; काही काळासाठी महामार्ग बंद करण्याची मागणी

समृद्धी महामार्गावर गेल्या १०० दिवसांत ९०० जणांनी आपला प्राण गमावला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गवर अपघातांची मालीका सुरुच असते. यामुळे आजवर शेकडो जणांचे बळी गेले आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघाता २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल या महामार्गावर शहापूरनजीक गर्डर कोसळून २० कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. समृद्धी महामार्ग लोकांसाठी जीवघेणी समृद्धी झाली असून दररोज लोकांचा जीव जातोय. काही काळासाठी हा महामार्ग बंद करा. आधी ज्या काही उपाययोजना करायच्या त्या करा. देवेंद्र फडणवीस यांचं स्वपन् जीवघेणं झालं आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय उडेट्टीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत स्थगन प्रस्तावाची सूचना आणली त्यावर वडेट्टीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या महामार्गावर तर २००- ३०० किमी वर रुग्णवाहिका, फूड प्लाझा असायला हवे होते. पण अद्याप तशी कुठलीही व्यवस्था नाही. पंतप्रधानांच्या हस्ते उद्धघाटन केलं. पण आता त्यात बदल करु शकता. २० लोकांच्या जीव गेला, याबाबत सरकार संवेदनशील आहे की नाही. या मृत्यूला जबाबदार कोण? या रस्त्याच्या कामात काही त्रुटी आहेत का? या महामार्गाचं ऑडिट करु घ्या. ज्या काही त्रुटी असतील त्या समोर आल्या पाहिजे. तोवर समृद्धी महामार्ग बंद करावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

तर समृद्धी महामार्गाचे लोकसभा निवडणूकीपूर्वी उद्धाटन करावं असी घाई सरकारला झाली. त्यामुळे किती लोकांचे प्राण जात आहेत? ज्या कंपन्यांना कामे दिली आहेत त्यांना अनुभव होता का? या प्रकरचं काम कंपनीला कुठे दिला आहे का? २० कामगारांचे नाहक बळी गेले. या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचा आदेश शासनाचा आहे. या महामार्गावर मृत्यूचा तांडव सुरुच आहे. याला जबाबदार कोण? या महामार्गावर १०० दिवसांत ९०० जण दगावले आहेत. राज्यातील जनतेचा जीव घेऊन जर समृद्धी होत असेल तर यावर शासनाने उत्तर दिलं पाहीजे. या महामार्गावर घडलेल्या घटनेला जबाबदार कोण? शासन, प्रशासन की व्यवस्था? हे सरकारने सांगवं. तसंच यापुढे अशी घटना होऊ नये. यासासाठी सरकार काय करणार याचं उत्तर द्यावं. समृद्धी महामार्गामुळे कोणाची समृद्धी झाली यावर देखील सभागृहात चर्चा होऊ द्या. अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रेदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी