सांस्कृतिक धोरण समितीत वादग्रस्त राहुल सोलापूरकर; नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

सांस्कृतिक धोरण समितीत वादग्रस्त राहुल सोलापूरकर; नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चहुबाजूंनी टीका झालेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे नाव पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरविणाऱ्या सल्लागार समितीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने आता आणखी वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Swapnil S

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चहुबाजूंनी टीका झालेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे नाव पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरविणाऱ्या सल्लागार समितीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने आता आणखी वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे महापालिकेत पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा प्रस्ताव आहे. पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याच्या सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचेही नाव आहे. मागील तीन वर्षांपासून पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. सोलापूरकर यांचे नाव आधीपासूनच या समितीत आहे. मात्र, आता त्यांचे नाव समोर आले आहे. राहुल सोलापूरकर यांच्या नावामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड यांची टीका

समितीत राहुल सोलापूरकर यांचे नाव असल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. तसेच राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये 'थोर' इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली. आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

लालबागचा राजाच्या विसर्जनात ‘विघ्न’; तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री उशिरा विसर्जन

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान ११ जणांचा मृत्यू

भटक्या विमुक्तांचा आभासी मुक्ती दिन!

भूपेनदा (डॉ. भूपेन हजारिका) यांना आदरांजली

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत