अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून खळबळ; प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना वगळले 
महाराष्ट्र

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून खळबळ; प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना वगळले

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या नावासमोर अनुक्रमे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष असा उल्लेखच नाही, तर अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. याशिवाय काहींची फक्त नावे असून त्यांना कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांची नावे किंवा पूर्वीची महत्त्वाची पदे नमूद केली नसल्याचे समोर आले आहे.

सुनेत्रा पवारांचा खुलासा

ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तत्काळ स्पष्टीकरण देत ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, सध्या माध्यमांमध्ये फिरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक त्रुटी आहेत.

त्या लवकरच दुरुस्त केल्या जातील. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच दिवशी निवडणूक आयोगाला “तांत्रिक आणि लिपिकीय चुका” दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र पत्रही पाठविण्यात आले आहे

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग