राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. 
महाराष्ट्र

४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २,३९८ कोटी रुपये; मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुदान वितरित

एका क्लिकवर सुमारे ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत २,३९८ कोटी ९३ लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : शासनाने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तब्बल ४९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल २,३९८ कोटी ९३ लाख रुपये अनुदान पोटी जमा करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्या उपस्थितीत अनुदान वितरित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत २,३९८ कोटी ९३ लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. 

२०२३ च्या खरीप हंगामात एकूण ९६ लाख ७८७ खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण ४,१९४ कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी १,५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस तर सोयाबीन साठी २,६४६ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटी द्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला. 

सोमवारी जवळपास ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील, तसतसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद