File photo 
महाराष्ट्र

पुण्याच्या भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला ; शेकडो बनावट एटीएम कार्डद्वारे लांबवले १ कोटी १५ लाख

यापूर्वी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर यंत्रणेवर हल्ला झाला होता. त्यातून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबवल्याची घटना २०१८ साली घडली होती

नवशक्ती Web Desk

पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाला असून खातेधारकांच्या ४९३ ATM कार्डचे क्लोन करुन त्यातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम लंपास करण्यात आली आहे. या बँकेची तब्बल १ कोटी १५ लाख ७०० रुपयांची रक्कम सायबर हल्लेखोरांनी लंपास केली आहे. या यासबर हल्लेखोरांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या काळात एटीएम कार्डचे क्लोन करुन सदाशिव पेठ, आकुर्डी, धनकवडी, बाणेर, कोथरुड, रवी मुंबई, सोलापूर, सांगली. इस्लामपूर, कोल्हापूर, वरळी आणि दिल्लीतील एटीएम केंद्रातून ही रक्काम चोरी केली आहे.

चोरट्यांनी तब्बल ४३९ एटीएम कार्डमधील ही रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. १ हजार २४७ व्यवहारातून १ कोटी १५ लाख ७०० रुपये लांबवले आहेत. यापूर्वी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर यंत्रणेवर हल्ला झाला होता. त्यातून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबवल्याची घटना २०१८ साली घडली होती.

हल्ला झाल्याची बाब भारती सहकारी बँकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतील. बँकेचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील यांनी याप्रकरणी पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले