महाराष्ट्र

बंगालच्या उपसागरात हमून चक्रीवादळ

सध्या हे वादळ बांगलादेशच्या किनारी भागांत असून येत्या काही तासांत ते पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे

नवशक्ती Web Desk

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर हवामानात बदल होत असतानाच तिकडे बंगालच्या उपसागरातही हमून नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाच्या पूर्वोत्तर पाच राज्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे.

सध्या हे वादळ बांगलादेशच्या किनारी भागांत असून येत्या काही तासांत ते पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या वादळाचा परिणाम त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम या पाच राज्यांना बसण्याची शक्यता असून या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये पुढील एक ते दोन दिवसांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं किनारी भागांतील नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आंध्र प्रदेश, ओदिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागातील नागरिकांनाही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही