महाराष्ट्र

यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले, "तुमची दाभोळकर..."

माझ्या जीवाला काही झालं, तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या

नवशक्ती Web Desk

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील काँग्रेससह सर्व पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भिडेंविरोधात काँग्रेसकडून राज्यभर निदर्शने केली जात आहेत. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर या संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाल्यानंतर भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात आता यशोमती ठाकूर यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत यशोमती ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "मनोहर कुलकर्णी हे सगळीकडे फिरत आहेत. पण, मला 'दाभोलकरांची जशी गत केली,तशी तुमची करु,' अशी धमकी देण्यात आली. महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबद्दल काहीही वक्तव्य केली जातात. आम्ही ***खोर म्हणलं, तर धमकी दिली जाते", असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "देवेंद्र फडणवीस म्हणातात की आम्हाला यात ओढू नका. दुसरीकडे अमरावतीचे राज्यसभा खासदार आमच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले होते. आमचा जीव गेला तरी चालेल, पण यांच सर्व उघड करणार आहे. माझ्या जीवाला काही झालं, तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भिडेंना पोलीस सुरक्षा देत आहेत मात्र, आम्हाला नाही", अशी खंत देखील यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली