FPJ
महाराष्ट्र

राज्यात १८ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करा; ईद-ए-मिलादच्या सुट्टीसाठी नसीम खान यांची मागणी

माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ईद-ए-मिलादून नबीची सुट्टी १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबर रोजी करण्याची मागणी केली.

Swapnil S

मुंबई : माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ईद-ए-मिलादून नबीची सुट्टी १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबर रोजी करण्याची मागणी केली.

नसीम खान यांनी त्यांच्या पत्रात लिहिले की, संपूर्ण विश्वाला शांतीचा भाईचाराचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबरसाहेबांचा जन्मदिवस १६ सप्टेंबर रोजी असून १७ सप्टेंबर रोजी हिंदू बांधवांचा गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्थी दिवस आहे. दिनदर्शिकेतदेखील १६ सप्टेंबरचा सुट्टीचा दिवस म्हणून उल्लेख आहे.

दोन्हीही धर्माचे पवित्र अशा सणाचे पावित्र्य राखण्याच्या अनुषंगाने ७ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया खिलाफत कमिटीमध्ये मुंबई सहित महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, मालेगाव, भिवंडी, ठाणे व इतर विविध मुस्लिम संघटनाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत राज्यात बंधुभाव व हिंदू-मुस्लिम एकोपा अबाधित राखण्याकरिता मुस्लिम बांधवांच्या मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जन्मदिवशी काढण्यात येणारी मिरवणूक १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेऊन १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी राज्यात सुट्टी घोषित करावी, अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी पत्राद्वारे केली.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल