मुख्यमंत्र्यांनी घेतली शहांची भेट; दुष्काळाबाबत भरीव मदत करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन X|Dev_Fadnavis
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी घेतली शहांची भेट; दुष्काळाबाबत भरीव मदत करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन

दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला नियमानुसार जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्लीत दिली.

Swapnil S

मुंबई : दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला नियमानुसार जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्लीत दिली. राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी तालुक्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्लीत शहा यांची भेट घेतली. यावेळी शहा यांना केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावाची प्रत देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री हे एनडीआरएफचे अध्यक्ष असतात. तसेच दुष्काळाबाबत जी मंत्री समिती मदतीची घोषणा करते, त्या समितीचेही अध्यक्ष असतात, असे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तर राज्यातील दुष्काळाची बातमी कळताच आपल्याशी स्वत:हून संपर्क केला. महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान केंद्राचे पथक पाहणीसाठी येणार आहे. स्वतः चौहान देखील महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

इतर नुकसानीच्या निकषात राज्यातील काही तालुके बसत नव्हते. पण अशा २० तालुक्यांनाही पीक नुकसानीच्या आधारावर मदत करण्यात येणार आहे. २००१ पासून आतापर्यंत दुष्काळ हा कायम नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला जाहीर झाला आहे. पण यावर्षी आपण आधीच दुष्काळ जाहीर केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

'ते' समाजकंटक नव्हेत, आंदोलन हा त्यांचा हक्क; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून हायकोर्टाची राज्य सरकारला चपराक

... तर SIR थांबवणे शक्य; माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे स्पष्ट मत

व्याजदर वाढीच्या झळा; रेपो दरात पाव टक्के वाढ, भविष्यात अधिक दरवाढीचे संकेत

पाणीसाठा घटला, चिंता वाढली! मोडकसागर धरणातील साठा प्रथमच ७० टक्क्यांवर; स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी होणार बंद