धीरेंद्र शास्त्रींचा अखेर माफीनामा  
महाराष्ट्र

धीरेंद्र शास्त्रींचा अखेर माफीनामा

नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर माफीनामा सादर केला आहे.

Swapnil S

नागपूर : नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर माफीनामा सादर केला आहे. ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,’ असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्याच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटले. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला...

धीरेंद्र शास्त्री यांनी आज पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. आज या देशात सनातनी धर्म आणि हिंदुत्व जिवंत असेल, तर त्याचे सर्वात मोठे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही 'हिंदू राष्ट्र' स्थापण्याचा संकल्प केला आहे, त्यांची निंदा आम्ही कधीच सहन करणार नाही. महाराजांप्रती आणि संतांप्रती असलेला त्यांचा भाव मी माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला होता’.

आपसांतील वादाचा दुसऱ्यांनाच फायदा...

धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, ‘जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आमचेच लोक आहेत. अशा मुद्द्यांवरून आपण आपापसात वाद घातला, तर त्याचा फायदा केवळ दुसऱ्यांनाच होईल. माझ्या मनात कुणाबद्दलही चुकीचा हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो’.

Mumbai : फाईव्ह स्टार हॉटेलवर पालिका मेहेरबान; विमानतळ परिसरातील पार्किंग कमी करणार, हाॅटेलवाल्यांना अधिकची जागा मिळणार  

खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे

राज्यात सूर्य आग ओकतोय; उष्माघाताने परभणीत एकाचा मृत्यू, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

१७ जागांसाठी जूनमध्ये रणधुमाळी; विधान परिषद स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ची बंगळुरूत बांधणी