महाराष्ट्र

धुळ्यात माजी स्थायी सभापतीच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात उचललं टोकाचं पाऊल

दोन दिवसांपूर्वीच आपला वाढदिवस केलेल्या विराज याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याची सर्वत्र चर्चा आहे.

Krantee V. Kale

नाशिक : धुळे महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज याने स्नेहनगर भागातील राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गुरुवारी (दि. ११ ) रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेने शहरभर खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वीच आपला वाढदिवस केलेल्या विराज याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याची सर्वत्र चर्चा आहे. कुटुंबीय बाहेर गेले असताना त्याने गळफास घेतला. जेव्हा कुटुंबीय घरी परतले, तेव्हा त्यांना लेकाला गळफास घेतलेले पाहून प्रचंड धक्का बसला. त्यांनी विराजला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन