संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मंगेशकर रुग्णालयाला कराबाबत नोटीस; २७ कोटींच्या थकबाकीसाठी पुणे पालिका आक्रमक

पुण्यातील नामांकित रुग्णालयांपैकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराची तब्बल २७ कोटींची रक्कम थकविल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील नामांकित रुग्णालयांपैकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराची तब्बल २७ कोटींची रक्कम थकविल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पुणे महापालिकाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे.

दीनानाथ रुग्णालयाने गेल्या ६ वर्षांत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाने कराचा एकही रुपया भरला नाही. रुग्णालयाने थकवलेला पालिकेचा कर हा थोडका नसून तब्बल २७ कोटी ३८ लाख रुपयांचा असल्याची माहिती आता समोर आली होती. रुग्णालय चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनने सन २०१४ पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यानंतर आता अखेर पुणे महापालिकाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे २०१४ पासूनची थकबाकी असून लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या नावाने पुणे पालिकेने नोटीस पाठवली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २२ कोटी ६ लाख, ७६ हजार रुपयेची थकबाकी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही थकबाकी भरणे आवश्यक आहे. येत्या दोन दिवसात २२ कोटींची थकबाकी न भरल्यास पुढील कारवाई केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम ४२ मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर जप्तीचे कारवाई करण्याचे महापालिकेने तोंडी आदेश दिले आहे.

रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका !

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाच्या हव्यासापोटी महिलेला रुग्णालयामध्ये दाखल न करून घेता पैशाची मागणी केल्याचे समोर आल्याने सर्व थरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेवरून पुणे महापालिका प्रशासन जागे झाले आहे. रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे. आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा, अशा संदर्भातले आदेश प्रत्येक खासगी रुग्णालयाला देण्यात आले आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाइकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक