यंदाच्या गणेशोत्सवात राज्यात डॉल्बी लेझर, प्रकाशझोत आणि एलईडीमुळे अनेकांना त्रास उद्भवल्याच्या घटना समोर आल्या. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रात लेझर लाईट, डॉल्बीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी केली केली आहे.
लेझर लाईट, एलईडी लाईट, डॉल्बीचे स्पष्ट परिणाम आरोग्यावर दिसू लागले असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याच्या देकील घटना समोर आल्या आहेत. लेझरमुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. तसंच डोळ्याच आजार उद्भवत आहेत. त्यामुळे आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या डॉल्बी, लेझर लाईट आणि एलईडी लाईटच्या वापरावर सार्वजनिक ठिकाणी कठोर निर्बंध आणण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्याने डॉल्बीच्या आवाजामुळे अनेकांचे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील हिंजवडीत योगेश अभिमन्यू साखरे या तरुणाचा डॉल्बीच्या तीव्र आवाजाने मृत्यू झाला. सांगतीलीत तासगाव येथे शेखर पावशे या तरुणाचा देखील डॉल्बीच्या तीव्र आवाजामुळे ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. सांगलीच्या वाळवा तालुक्याच्या दुधारी येथे ३५ वर्षीय प्रवीण शिरतोडे या तरुणाचाही असाच डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला होता.
अनेक मिरवणुकांदरम्यान किंवा कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट आकाशाच्या दिशेने तसंच जमलेल्या लोकांच्या अंगावरुन फिरवली जाते. यामुळे कायमचं अंधत्व येण्याचा धोका असतो. ही परिस्थिती लक्षात घेता. सार्वजनिक ठिकाणी लेझर लाईट आणि एलईडी लाईटच्या वापरावर कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे. याबाबत कठोर नियम करण्याची आवश्यकता असल्याचं वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकारने याबाबत पुढाकार घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी विजय वडट्टीवार यांनी केली आहे.