महाराष्ट्र

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सातारा सज्ज; ४३ ठिकाणी वारकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था; १७ ठिकाणी हिरकणी कक्ष

आळंदी येथील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सातारा जिल्ह्यात गुरुवार, २६ जून रोजी येत असल्याने प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खंडाळा व फलटण तालुक्यातील पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी ४३ हून अधिक ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर अंगणवाड्यांमध्ये महिला वारकरी मुक्कामी राहणार असून १७ ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Swapnil S

कराड : आळंदी येथील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सातारा जिल्ह्यात गुरुवार, २६ जून रोजी येत असल्याने प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खंडाळा व फलटण तालुक्यातील पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी ४३ हून अधिक ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर अंगणवाड्यांमध्ये महिला वारकरी मुक्कामी राहणार असून १७ ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवार, २६ ते ३० जून दरम्यान सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. जिल्ह्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत नियोजन केले आहे. पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा पिंपरे खुर्द, दत्त मंदिर काळज, सुरवडी, विडणी, तर दुपारचा विसावा निरा, लोणंद चांदोबाचा लिंब, वडजल, निंबळक फाटा येथे होणार आहे. तर मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे होणार आहे.

वारकर्‍यांसाठी ४३ ठिकाणी तात्पुरता विसावा व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४३ अंगणवाड्या असून एका अंगणवाडीमध्ये २० ते २५ महिलांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. ४३ अंगणवाड्यांमध्ये १ हजार ७५ महिलांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १७ ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पालखी मुक्कामावेळी लोणंद येथे ९ जि.प. शाळा, तरडगाव येथे ९, फलटण येथे ४, बरड येथे २ अशा मिळून २४ प्राथमिक शाळा वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पालखी मार्गावर ४३ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ४३ ठिकाणी सॅनेटरी नॅपकिन सुविधा, ४३ शौचालय युनिटची संख्या उभारली आहे. सॅनेटरी नॅपकिन वेंडींग मशिन १९, तर सॅनेटरी नॅपकिन बर्निंग मशिन २३ ठिकाणी लावण्यात येणार आहेत. हिरकणी कक्षासाठी ३० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शौचालय युनिटच्या देखभालीसाठी ८२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १७ ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये गरोदर, स्तनदा माता यांच्यासाठी विश्रांती व स्तनपानाची सोय केली आहे. पाळणा, खेळणी, स्तनपान विषयक माहितीदर्शक फलक, पिण्याच्या पाण्याची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्या व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जि. प.

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न