महाराष्ट्र

"आता हे ट्विट डिलीट करू नका!", 2019 मधील 'त्या' पोस्टवरुन ठाकरे गटाचा शिंदेंना टोला

"जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून AB form का घेतला बरं?" असा सवालही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Rakesh Mali

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर निकाल जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही. एकनाथ शिंदेंना पक्षातून काढून टाकण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरीणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो, असे नार्वेकरांनी म्हटले होते. तसेच, त्यांनी शिवसेनेची 1999 सालची घटना मान्य करत ( आणि 2018 ची घटना अमान्य ठरवत) ठाकरेंचे पक्षप्रमुख पदच अमान्य केले होते. यावरुन आता ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जुनी सोशल मीडिया पोस्ट शोधून त्यावरून निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत ट्विटर हँडलवरुन 30 सप्टेंबर 2019 रोजीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट शेअर करुन टोला लगावला आला आहे. यात "जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून AB form का घेतला बरं?" असा सवाल करण्यात आला आहे. तसेच, "आता हे ट्विट डिलीट करू नका!" असे म्हणत एकनाथ शिंदे यांना टॅग करण्यात आले आहे.

काय आहे पोस्ट?

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना त्यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी "शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक2019 करिता कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून 'एबी फॉर्म' देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शविला. मा. उध्दवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार!", असे लिहून उद्धव ठाकरे यांना टॅग केले होते. ठाकरे गटाने शिंदेची ही पोस्ट उकरुन काढत आता खोचक सवाल विचरला आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल