महाराष्ट्र

गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : अनंत गर्जे याच्या जामिनावर निर्णय राखीव

डॉ. गौरी पालवे (२८) हत्या प्रकरणी त्यांचा पती भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली.

Swapnil S

मुंबई : डॉ. गौरी पालवे (२८) हत्या प्रकरणी त्यांचा पती भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश रूपाली पवार यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर निर्णय राखून ठेवला. तो २३ फेब्रुवारीला देण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दंतवैद्य म्हणून कार्यरत असलेल्या गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे (२८) हिने गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली. गौरी आणि गर्जे यांचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झाल्याने गौरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गर्जे, त्याचा भाऊ आणि बहीण यांच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.अनंत गर्जे याला अटक केले. गर्जे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यांपासून कारागृहात असलेल्या अनंत गर्जे याने जमिनासाठी अर्ज केला. या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुपाली पवार यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी गर्जे यांच्यावतीने ऍड.मंगेश देशमुख यांनी गर्जे यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य केलेले आहे. मुंबई पोलिसांच्या एसआयटीने तपास पूर्ण करून गर्जे याची बहीण शीतल गर्जे-अंधाळे आणि भाऊ अजय गर्जे यांना क्लीनचिट देत केवळ अनंत गर्जे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले.आरोपपत्रात ठेवण्यात आलेले आरोप हे निराधार असून खटल्याचा निपटारा तत्काळ होणार नसल्याने जामीन मंजूर करावा अशी विनंती केली.

तपासयंत्रणेचा जामिनाला जोरदार विरोध

आरोपीने तपासात सहकार्य केलेले नाही, त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, तसेच पुरव्यांशी छेडछाड ही करू शकतात. एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण असल्याने घटना अतिशय संवेदनशील आहे अशी भूमिका घेत जामीनाला विरोध केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादनंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला.

Delhi CNG Blast : सीएनजी भरतानाच ट्रकच्या टँकचा भीषण स्फोट; ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, परिसर हादरला

खोपोली-सीएसएमटी लोकल दादरपर्यंतच; प्रवाशांचे हाल, पूर्ववत सेवा सुरू करण्याची मागणी

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; मीरा-भाईंदर ते विरार मेट्रोला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मान्यता