महाराष्ट्र

Kolhapur : चालकच निघाला चोर; ७.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

फूड मॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून सोन्याचे दागिने, रोकड आणि घड्याळ चोरी करणाऱ्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ७ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीसोबत प्रवास करणारा चालकच या चोरीमागे असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : फूड मॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून सोन्याचे दागिने, रोकड आणि घड्याळ चोरी करणाऱ्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ७ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीसोबत प्रवास करणारा चालकच या चोरीमागे असल्याचे तपासात उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहन आनंदराव आडागळे (६२) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई पार्क परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मुक्कामासाठी आलेल्या फिर्यादीच्या वाहनातून २५ मे रोजी अज्ञात व्यक्तीने सोन्याचे दागिने, रोकड आणि घड्याळ चोरी केले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या धाग्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून तीन सोन्याच्या अंगठ्या (२० ग्रॅम), एक सोन्याची चेन (१० ग्रॅम), एक सोन्याचे ब्रेसलेट (२० ग्रॅम), दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे, स्कायम कंपनीचे घड्याळ आणि १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण ७.९७लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती