महाराष्ट्र

गरुडा विरुद्ध डुग्गा! संक्रांतीला अहमदाबाद-छत्रपती संभाजीनगरच्या पतंगांची 'टक्कर'

Swapnil S

उमेश पठाडे /छत्रपती संभाजीनगर : नववर्षाचा पहिला सण संक्रांतीला आकाशात अहमदाबादचे पतंग आणि छत्रपती संभाजीनगरच्या पतंगांमध्ये जोरदार बाजी रंगणार आहे. शहरातील खानदानी कारागिरांनी बनविलेल्या तावाच्या पतंगाची टक्कर गुजरातमधून आलेल्या डिझाइनर पतंगाशी होणार असल्याने या पतंगबाजीत कोण जिंकणार, याकडे पतंगप्रेमींचे लक्ष लागले आहे.

गुजरातमधून ‘गरुडा’च्या आकारातील पतंग आले आहेत. हे कागदाच्या तावापासून नव्हे तर पॅरेशूट मटेरियलपासून बनविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात कामट्यांऐवजी फायबर व ॲल्युमिनियमच्या काड्यांचा वापर करण्यात आला आहे. ८० ते ५०० रुपये प्रतिनगाने हे पतंग विकले जात आहेर.

छत्रपती संभाजीनगरचा 'ब्रँड'

छत्रपती संभाजीनगरच्या पतंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कमी दाबाच्या पट्ट्यात उडतील, असे पतंग येथील खानदानी कारागीर बनवत आहेत. कागदी ताव वापरला जातो, तुळसीपूरहून येणारी कामटीला सोलून पातळ केली जाते. कमी हवेत उडण्यासाठी कामटीला किती ताणायचे, येथेच कारागिराचे कौशल्य पणाला लागते. पतंगाच्या कडेला कागद दडपून त्यात दोरा भरला जातो. यामुळे पतंग लवकर फाटत नाही. हे पतंग चांगल्या प्रकारे आकाशात उडतात. अवघ्या ५ ते ८० रुपयांपर्यंत हे पतंग विकतात. छत्रपती संभाजीनगरच्या पतंगाचा ब्रँड बनला आहे.

४० लाख पतंगांची थप्पी

संक्रांत सण आठ दिवसांवर आहे. शहरात ५३ खानदानी कारागीर परिवारांनी वर्षभरात ५० लाख पतंग तयार केले आहे. तर १५ होलसेलर पतंगाची विक्री करतात. यंदा जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, निजामाबाद येथील होलसेल विक्रेत्यांनी पाठ फिरवली. ढगाळ वातावरणामुळे पतंग खरेदी थांबली आहे. त्यात मागील वर्षीच्या तुलनेत पतंगाचे भाव पाच टक्क्यांनी वाढले आहेत. या सर्वाचा परिणाम विक्रीवर झाला असून विक्रीविना डुग्गा, पौना, ढाच्चा अशा ४० लाख पतंगाची थप्पी लागली आहे. कारागीर व विक्रेते चिंतीत आहेत.

- सय्यद अमिनोद्दीन, पतंग होलसेलर

एक कुटुंब रोज बनवते ५०० पतंग

आमच्या कुटुंबात ६ जण पतंग बनवितात. दररोज आम्ही ५०० पतंग बनवतो. त्यात गुजरातहून पतंग विक्रीला आले आहेत. आता मॉलमध्येही पतंग विकले जात आहेत. याचा परिणामही जाणवत आहे.

- अनिल राजपूत, पतंग, कारागीर

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलावर कारवाई होणार का? पुणे अपघातावर काय म्हणाले फडणवीस?

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण