Hp
Hp
महाराष्ट्र

"एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा...", लाख मराठ्यांसमोर जरांगेंचा एल्गार

नवशक्ती Web Desk

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. आज (१४ ऑक्टोबर) जालन्याच्या आंतरवाली सराटीमधून शिंगे फडणवीस सरकारला निर्णायक इशारा दिला आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी एकतर माजी अंतयात्रा निघेल नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, असं म्हणत एल्गार केला. आज आंतरवालीतील सभेत जरांगे यांनी अतिविराट सभेसमोर सरकालला अल्टिमेटम दिला. दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही. असं देखील जरांगे यांनी सरकारला ठणाकावून सांगितलं.

मनोज जरांगे बोलाताना म्हणाले, व्यावसायावर आधारित जाती निर्माण झाल्याचं कायदा सांगतो. शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाणपत्र दिली, असं म्हणत त्यांनी राज्याचे पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान यांनी विनंती केली. ते म्हणाले की, सर्वांनी मिळून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावाला. मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करुन कुणबी प्रमाणपत्र द्यावं. गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रासह राज्याने तातडीने निर्णय घ्यावा असं जरांगे म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि समावेश केल्याचा निर्णय जाहीर करावा. देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्या सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य सरकारला या कोट्यावधी मराठा समाजाकडून हात जोडून विनंती करुन सांगतो की, सगळ्यात मोठ्या समाजाची विनाकारण हालअपेष्ठा करु नका, अशी जाहीर विनंती त्यांनी केली. मराठा समाजासाठी गठित केलेल्या समितीचं काम बंद करा. तुमचं आमचं ठरल होतं. चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारीत करतो. समितीला पाच हजार पानांचा पुरावा मिळाला आहे. त्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करा, अशी मागणी त्यांनी केली.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल