एकनाथ शिंदे एक्स
महाराष्ट्र

कमी बोला आणि जास्त काम करा; एकनाथ शिंदे यांचा मंत्री, आमदारांना सल्ला

मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीचे नाव खराब होत असून यापुढे प्रसारमाध्यमांशी बोलताना कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंत्री व आमदारांना दिला.

Swapnil S

मुंबई : मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीचे नाव खराब होत असून यापुढे प्रसारमाध्यमांशी बोलताना कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंत्री व आमदारांना दिला.

तुम्ही मागणी करा, हवा तेवढा पैसा देतो, माझ्या बापाचा कुठे पैसा, सरकारचा पैसा असे विधान शिंदे सेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट यांनी नुकतेच केले होते, तर मंत्री शिरसाट यांच्या घरी पैशांची बॅग असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. आमदार संजय गायकवाड यांची उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण, मंत्री संजय राठोड यांचे वादग्रस्त विधान अशा विविध कारणांमुळे आमदार, मंत्री शिंदे सेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. यामुळे महायुतीचे नाव खराब होत असून यापुढे प्रसारमाध्यमांशी बोलताना कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. महायुतीतील घटक पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यातच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे दिल्लीवारीवर असून बुधवारी सकाळी ते दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात विशेष करून शिंदे सेनेतील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीवर टीकेची तोफ डागली जात असल्याचे समजते. मंत्र्यांची बेताल वक्तव्ये, प्रसारमाध्यमांशी बोलताना काही भान न ठेवणे यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री व आमदारांना सबुरीचा सल्ला देत कमी बोला जास्त काम करा, असे निर्देश दिले आहेत.

फेरबदलाचे संकेत

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील मंत्र्यांना अडीच वर्षांच्या कालावधीची आठवण करून दिली. तसेच मंत्रिमंडळात चांगली कामगिरी करत नसलेल्या मंत्र्यांना यावेळी फेरबदलाचे संकेतच दिल्याचे समजते.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई