महाराष्ट्र

... तर अकेला बच्चू कडू काफी है

वरिष्ठांना काही अडचणी असतील तर समजून घ्यायला हवे. मला शब्द दिला आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात हा शब्द पाळला गेला नसला तरी

प्रतिनिधी

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यामध्ये 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काही अपक्षांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिकिया देताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपद देणार असा शब्द दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, 'यामध्ये नाराज असण्याचा प्रश्न नाही, मी मंत्री व्हावे असे सर्वांना वाटते. मला मंत्रिपदासाठी थांबण्यास सांगितले म्हणजे, ते कायमचं थांबत नाही, काही दिवसांसाठी थांबवलं आहे... एकत्र राहायचं तर समजून घ्यायला हवं.'

अजून विस्तार झाल्यावर मंत्रिपद दिले जाईल

वरिष्ठांना काही अडचणी असतील तर समजून घ्यायला हवे. मला शब्द दिला आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात हा शब्द पाळला गेला नसला तरी दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर मंत्रिपद मिळेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

तर अकेला बच्चू कडू काफी है

मला खुद्द मुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यांनी मला सगळं सांगितलं. मी त्यांना म्हणालो काही हरकत नाही. आता मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, अन्यथा संकट येईल. तुम्हाला या पदावरून हटवले तर तुम्हाला राग येणार नाही का? थोडासा राग होताच तो निघून जाईल. नाराजी दूर झाली नाही तर अकेला बच्चू कडू काफी आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली