@supriya_sule/X
महाराष्ट्र

पंधराशेपेक्षा आमच्या मुलांना शिक्षण, रोजगार देण्याची महिलांची भावनिक साद!

जळगाव शहरात दि. १३ ऑगस्टला शासनाच्या वतीने लाडकी बहीण मेळावा पार पडला. या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी बचत गट, अंगणवाडी सेविका यांना सक्ती करण्यात आल्याची तक्रार या मेळाव्यात केली गेली.

विजय पाठक

विजय पाठक/ जळगाव

ताई आम्हाला सरकारने देऊ केलेली पंधराशे रुपयांची मदत नको, पण आमच्या शेतमालाला हमीभाव द्या, आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्या, ज्यामुळे त्याला रोजगार मिळेल आणि मुलांना दारूच्या व्यसनापासून वाचवा, अशी भावनिक विनंती शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने आयोजित केलेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांना केली.

जळगाव शहरात दि. १३ ऑगस्टला शासनाच्या वतीने लाडकी बहीण मेळावा पार पडला. या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी बचत गट, अंगणवाडी सेविका यांना सक्ती करण्यात आल्याची तक्रार या मेळाव्यात केली गेली. तसेच शासकीय मेळाव्यात आलेल्या बहिणी या दिवसभर उपाशी असल्याचे मेळाव्याचे आयोजक गुलाबराव देवकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. हाच धागा पकडून खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित महिलांशी मुक्त संवाद सुरू केला. त्या म्हणाल्या की , संविधानात मनमोकळेपणाने मतदान करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण हे राज्य सरकार दडपशाही करत असून या दडपशाहीच्या सरकारला हद्दपार करण्याची हीच वेळ आली आहे. या सरकारला लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी आठवल्या नाहीत नंतर त्या लाडक्या झाल्या, याचा चांगला अनुभव मला आल्याचे खा. सुळे यांनी सांगितले. लोकसभेनंतर त्यांना फक्त बहिणी दिसतात आणि ते फक्त बहिणींवर बोलतात दुसरे काही नाही, असे सांगत उपस्थित महिलांशी मुक्त संवाद सुप्रिया सुळे यांनी सुरू केला. उपस्थित महिलांनी उभे रहात आपल्याला काय हवे, यावर बोलायला सुरुवात केली.

सोयाबीनला दहा, तर कापसाला बारा हजार

शेतकरी हा देशाचा कणा असून शेतीवर शून्य टक्के कर हवा, असे मत मांडले जाताच दुसऱ्या महिलेने धीटपणे शेतमालाला भाव मिळत नाही, तेव्हा हमीभाव मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी लावून धरली. किती भाव हवा असे विचारता सोयाबीनला दहा हजार तर कापसाला बारा हजाराचा भाव मिळणे गरजेचे असल्याचे सांगताच अन्य महिलांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या मागणीला संमती दर्शवली.

दारूबंदची मागणी

धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारू विकली जाते. हा मुद्दा ऐरणीवर असल्याचे सुळेंना जाणवले. आमची १८ वर्षाची मुले ही व्यसनाधीन होत आहेत. शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडतात. आम्ही दारूबंधीसाठी खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नसल्याचे सांगत दारूबंदी करण्याची मागणी केली.

सुळेंचे आवाहन

महिलांशी संवाद साधतांना अखेर सुप्रिया सुळे यांनी सध्या दिले गेलेले १५०० रु. हे मतांचे चॉकलेट असल्याचे सांगत लोकसभेपूर्वी हे सरकार पक्ष फोडण्याचे उद्योग करत होते. पक्ष फोडून चिन्ह घेण्याचे पाप यांनी केले, यासाठी मी लढत असून आज माझ्यावर अन्याय झाला असून उद्या तुमच्यावर वेळ येईल. आज पक्ष फोडलात उद्या घर फोडतील सांगत महाराष्ट्रातील जनता हुषार आहे. पुढचे सरकार कष्ट करणाऱ्यांचे असणार आहे, त्यासाठी आपण ताकदीने कामाला लागू या, असे आवाहन केले.

महिलांचा आक्रोश

तुम्हाला हे पंधराशे हवेत काय विचारता वावडदा येथील राधाबाई वास्मिक या महिलेने आम्हाला हे पैसे नको, पण आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे चांगले शिक्षण मिळाले तर रोजगार चांगला मिळेल अशी भावना व्यक्त केली. बँकेकडून घेतलेले कर्जावर बँकांना व्याज द्यावे लागते ते व्याज घेऊ नये अशी जोरदार मागणी पुढे आली. आशावर्करना तीन महिन्यांपासून पगार नाही, असे सांगताच याप्रकरणी आपण उपोषणास बसू असे खा. सुळे यांनी सांगत आपण व्यसनमुक्तीचे कायक्रम घेणार असल्याचे उत्तर दिले. बचत गट अंगणवाडी पोषण आहार अनुदान मिळण्यासाठी होणारी फिरवाफिरवी, असे अनेक प्रश्न महिलांनी मांडले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली दोन हजार कोटींची लाच अमेरिकेतील फेडरल कोर्टातील सुनावणीत गौतम अदानींसह ८ जणांवर आरोप

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान