संग्रहित छायाचित्र  Photo : X (CMO Maharashtra)
महाराष्ट्र

लाडक्या बहिणी संतापल्यास घरी बसावे लागेल! मुख्यमंत्र्यांची भाजपच्याच आमदारावर आगपाखड

अभिमन्यू पवार यांनी अवैध दारूविक्रीचा मुद्दा उपस्थित करत लाडक्या बहिणींचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्र्यांचा संताप अनावर झाला. “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सर्वांसमोर आगपाखड केली.

Swapnil S

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना खडेबोल सुनावले. अभिमन्यू पवार यांनी अवैध दारूविक्रीचा मुद्दा उपस्थित करत लाडक्या बहिणींचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्र्यांचा संताप अनावर झाला. “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सर्वांसमोर आगपाखड केली.

अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीचा मुद्दा सभागृहात पोटतिडकीने मांडला. “आमच्या महिला भगिनी मद्यविक्री बंद व्हावी, यासाठी लढत आहेत. अवैध दारू विक्रीवर आळा बसावा, यासाठी आमच्या लाडक्या बहिणी आवाज उठवत आहेत. अवैध दारूविक्री हे आमच्या लाडक्या बहिणींचे मोठे दुःख आहे. सरकारने यासंदर्भात बैठक घेतली होती आणि कारवाईचे निर्देश दिले होते. आम्ही महसूल विभाग, अन्न व औषध प्रशासनाला यासंदर्भात कळवले. विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात निर्देश देऊनही याप्रकरणी कारवाई झालेली नाही. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. याकडे सभागृहाने लक्ष द्यावे,” असे अभिमन्यू पवार यांनी सभागृहाला सांगितले.

अभिमन्यू पवार यांच्याआधी लाडक्या बहिणींचा उल्लेख केल्याबद्दल फडणवीस यांनी विरोधकांनाही चांगलेच फैलावर घेतले होते. मात्र, त्यानंतर पाच मिनिटांनी पवार यांनीही लाडक्या बहिणींचा संदर्भ दिल्याने मुख्यमंत्री चांगलेच वैतागले. ते म्हणाले की, “मी सभागृहातील सदस्यांना पुन्हा एकदा सांगतो की, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण योजना आणू नका. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात जाऊ नका. अन्यथा घरी बसावे लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणण्याला काय अर्थ आहे? लाडक्या बहिणींचे पैसे चालू राहणार आहेत. ही योजना चालू राहील. या योजनेची दुसऱ्या योजनेशी तुलना करता येत नाही. विधानसभा अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील आणि अंमलबजावणी झाली नसेल तर ती आता तातडीने केली जाईल.”

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

लाडक्या बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणका; राज्य सरकार पैसे परत घेणार; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

IndiGo च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात; गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

राज्यात आजपासून थंडीची लाट येणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा