भोंदूबाबा खरातबाबत धक्कादायक खुलासे; मुलींसोबत दारू प्यायचा, खंडण्यांतून कमावले कोट्यवधी  (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

भोंदूबाबा खरातबाबत धक्कादायक खुलासे; मुलींसोबत दारू प्यायचा, खंडण्यांतून कमावले कोट्यवधी

माता-पित्याच्या मृत्यूची भीती घालून कथित ‘मृत्युयोग’ टाळण्यासाठी खरातने कोट्यवधी रुपये उकळलेल्या वरळी येथील व्यावसायिक ललित पोफळे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Swapnil S

नाशिक : माता-पित्याच्या मृत्यूची भीती घालून कथित ‘मृत्युयोग’ टाळण्यासाठी खरातने कोट्यवधी रुपये उकळलेल्या वरळी येथील व्यावसायिक ललित पोफळे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मिरगाव येथील फार्महाऊसवर खरात हा मुली आणि महिलांसोबत दारू प्यायचा तसेच नशेत महिलांसोबत अश्लील चाळे करायचा. त्याने खंडणी स्वरूपात कोट्यवधीची माया कमावली. हे सर्व प्रकार फार्महाऊस वरील ‘त्या’ आचाऱ्याने आपल्याजवळ कथन केल्याचा दावा पोफळे यांनी एसआयटीला दिलेल्या जबाबात केला आहे.   

खरात याच्या कृत्यांचा संशय आल्यानंतर आपण विश्वासातील एका स्वयंपाक्याला फार्महाऊसवर कामासाठी पाठवल्याचे सांगत त्याच्याकडून वेळोवेळी माहिती घेतल्याचे पोफळे म्हणाले. खरातला सामुद्रिक शास्त्र अवगत आहे आणि सिद्ध शक्ती प्राप्त आहे; तो अंकशास्त्रातला आणि धार्मिक अनुष्ठानाच्या आधारे भाकीत सांगतो, असे एका बँक अधिकाऱ्याने सांगितल्यावर आपली आणि खारातची ओळख झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकदा माझ्या घरी गप्पा मारत असताना खरातने अचानक मूठ बंद करून उजव्या हातातून काजू कतली काढली. मला म्हणाला, हा घ्या प्रसाद. त्यातून मला खरातकडे दिव्यशक्ती असल्याचा ठाम विश्वास बसला. खरात मुंबईला यायचा तेव्हा मला हॉटेल आणि राहण्याची तसेच गाडीची व्यवस्था करायला सांगायचा, अशी माहितीही पोफळे यांनी दिली.

खरात याने अनेकांना आई-वडिलांच्या मृत्यूचा धाक, तर गंडांतर योग अवतार पूजा असे सांगून त्याने माझ्यासह अनेकांना लुबाडल्याचे पोफळे म्हणाले. खरात हातचलाखी करून चमत्कार,जादू ,नकली साप वापरून भीती दाखवायचा. खरात काही मुली आणि महिलांना फार्महाऊसवर घेऊन येत असे आणि येण्याच्या आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायला सांगत असे, अशी माहिती कुकने आपल्याला दिल्याचे पोफळे यांनी एसआयटीला सांगितले.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड